Friday, 21 October 2022

सुरमाड, भेरला माड, Fishtail Palm

      "सुरमाड" किंवा "भेरला माड" हा कोकण व पश्चिम घाटात आढळणारा माड कुळातील वृक्ष. याचे शास्त्रीय नाव 'कॅरिओटा युरेन्स ' असे आहे. युरेन्स या शब्दाचा अर्थ खाजाळू असा होतो. याची फळे खाल्ल्यास तोंडाला खाज सुटते, त्यावरून हे नाव ठेवले आहे. जंगलात आढळणारी ही झाडे मोठ्या शहरांमध्ये रस्त्याकडेला लावलेली दिसून येतात.

     माड (नारळ) हा किनारपट्टीलगत खालच्या पट्ट्यात आढळतो तर सुरमाड हा त्यापेक्षा जरा वरच्या पट्ट्यात म्हणजे डोंगरउतारावरील जंगलात आढळतो. मालवणीत डोंगर उतारावरील भाग म्हणजे "भरड" जमीन आणि हा भरडावर आढळत असल्यामुळे याला "भरडो माड" किंवा "भरडी माड" म्हटले जात असावे. पुढे कदाचित त्याचा अपभ्रंश होऊन "भेरलो माड" नाव प्रचलित झाले असावे. प्रदेशानुसार नावात भेरला, भेरलो, भेडलो, भेललो अशी भिन्नता आढळते.

     भेरला माड हा माडासारखाच दिसतो. मात्र त्याचे खोड माडापेक्षा जाड व आतून पोकळ असते. झावळ्या मोठ्या असून त्यांच्या कडा माशाच्या शेपटीसारख्या दिसतात, म्हणून इंग्लिश मध्ये याला "फिशटेल पाल्म" म्हटले जाते. फुलोऱ्याच्या लांब लोंबणाऱ्या माळांवर सोनेरी-पिवळी फुले येतात. दुसर्‍या दिवशी सकाळी झाडाखाली फुलांचा सडा पडलेला दिसतो. फळे गोलाकार असून त्यात अर्ध्या सुपारीच्या आकाराच्या बीया असतात.

     भेरला माडाची फळे कटिंदर किंवा कांड्याचोर (Palm Civet Cat) तसेच धनेश (Hornbill), कोकीळ व इतर अनेक पक्षी व प्राणी आवडीने खातात व विष्ठेमार्फत बीजप्रसार करतात. जायन्ट रेडआय, पाल्मफ्लाय व पाल्म बॉब फुलपाखरांचे सुरवंट याच्या पानांवर वाढतात.

     पूर्वी तळकोकणात भेरला माडाचा वापर वेगवेगळ्या कारणांसाठी केला जायचा. याच्या मुळांजवळील खोडाचा भाग कापून, आतून पोकरून, जाडे मीठ ठेवण्यासाठी "डोण" व लाटीने पाणी काढण्यासाठी लागणारे "कोळमे" तयार केले जायचे. खोडाचे दोन भाग करून आतील गर काढून, त्यापासून झाडांना पाटाने पाणी देण्यासाठी तसेच कोकमातील रस बियांपासून वेगळा करण्यासाठी वापरला जाणारा "भरल" तयार केला जायचा. खोड उभे चिरून, तासून त्यापासून नांगरासाठी लागणारे "इषाड" बनवले जायचे, तसेच गोठ्याच्या "गवानी" तयार केल्या जायच्या. सुरमाडाचे न उमललेली पोवली (फुलोरा) कापून त्यातील स्त्रावापासून ताडी काढली जाते. श्रीलंकेत या स्त्रावापासून "किथुल गुळ" तयार केले जाते.

     गावातील बदललेल्या जीवन शैलीमुळे ह्या गोष्टी नामशेष होत आल्यात आणि भेरला माडाचा उपयोग फक्त लग्न व शुभकार्यात मंडप सजावटी पुरताच शिल्लक राहिला असून तो ही हळूहळू कमी होत चालला आहे. सद्ध्या याची पाने पुष्पगुच्छ व पुष्पसजावटीसाठी मुंबई सारख्या शहरात निर्यात केली जातात. यामुळे स्थानिक जंगलातून याच्या झावळ्या तोडून आणतात त्याचबरोबर झाडाचा शेंड्यालाही हानी पोहोचवतात. या तस्करीत परप्रांतीयांचा सहभाग वाढत आहे. मात्र याच्या संरक्षणाबाबत किंवा लागवडीबाबत तेवढी जागरुकता दिसत नाही.

- नितीन कवठणकर.
शेअर नक्की करा. नावासह, नाव पुसून नको.