Thursday, 10 November 2022
Argyreia pilosa
Friday, 4 November 2022
Alysicarpus vaginalis
Alysicarpus ovalifolius
Friday, 21 October 2022
सुरमाड, भेरला माड, Fishtail Palm
"सुरमाड" किंवा "भेरला माड" हा कोकण व पश्चिम घाटात आढळणारा माड कुळातील वृक्ष. याचे शास्त्रीय नाव 'कॅरिओटा युरेन्स ' असे आहे. युरेन्स या शब्दाचा अर्थ खाजाळू असा होतो. याची फळे खाल्ल्यास तोंडाला खाज सुटते, त्यावरून हे नाव ठेवले आहे. जंगलात आढळणारी ही झाडे मोठ्या शहरांमध्ये रस्त्याकडेला लावलेली दिसून येतात.
माड (नारळ) हा किनारपट्टीलगत खालच्या पट्ट्यात आढळतो तर सुरमाड हा त्यापेक्षा जरा वरच्या पट्ट्यात म्हणजे डोंगरउतारावरील जंगलात आढळतो. मालवणीत डोंगर उतारावरील भाग म्हणजे "भरड" जमीन आणि हा भरडावर आढळत असल्यामुळे याला "भरडो माड" किंवा "भरडी माड" म्हटले जात असावे. पुढे कदाचित त्याचा अपभ्रंश होऊन "भेरलो माड" नाव प्रचलित झाले असावे. प्रदेशानुसार नावात भेरला, भेरलो, भेडलो, भेललो अशी भिन्नता आढळते.
भेरला माड हा माडासारखाच दिसतो. मात्र त्याचे खोड माडापेक्षा जाड व आतून पोकळ असते. झावळ्या मोठ्या असून त्यांच्या कडा माशाच्या शेपटीसारख्या दिसतात, म्हणून इंग्लिश मध्ये याला "फिशटेल पाल्म" म्हटले जाते. फुलोऱ्याच्या लांब लोंबणाऱ्या माळांवर सोनेरी-पिवळी फुले येतात. दुसर्या दिवशी सकाळी झाडाखाली फुलांचा सडा पडलेला दिसतो. फळे गोलाकार असून त्यात अर्ध्या सुपारीच्या आकाराच्या बीया असतात.
भेरला माडाची फळे कटिंदर किंवा कांड्याचोर (Palm Civet Cat) तसेच धनेश (Hornbill), कोकीळ व इतर अनेक पक्षी व प्राणी आवडीने खातात व विष्ठेमार्फत बीजप्रसार करतात. जायन्ट रेडआय, पाल्मफ्लाय व पाल्म बॉब फुलपाखरांचे सुरवंट याच्या पानांवर वाढतात.
पूर्वी तळकोकणात भेरला माडाचा वापर वेगवेगळ्या कारणांसाठी केला जायचा. याच्या मुळांजवळील खोडाचा भाग कापून, आतून पोकरून, जाडे मीठ ठेवण्यासाठी "डोण" व लाटीने पाणी काढण्यासाठी लागणारे "कोळमे" तयार केले जायचे. खोडाचे दोन भाग करून आतील गर काढून, त्यापासून झाडांना पाटाने पाणी देण्यासाठी तसेच कोकमातील रस बियांपासून वेगळा करण्यासाठी वापरला जाणारा "भरल" तयार केला जायचा. खोड उभे चिरून, तासून त्यापासून नांगरासाठी लागणारे "इषाड" बनवले जायचे, तसेच गोठ्याच्या "गवानी" तयार केल्या जायच्या. सुरमाडाचे न उमललेली पोवली (फुलोरा) कापून त्यातील स्त्रावापासून ताडी काढली जाते. श्रीलंकेत या स्त्रावापासून "किथुल गुळ" तयार केले जाते.
गावातील बदललेल्या जीवन शैलीमुळे ह्या गोष्टी नामशेष होत आल्यात आणि भेरला माडाचा उपयोग फक्त लग्न व शुभकार्यात मंडप सजावटी पुरताच शिल्लक राहिला असून तो ही हळूहळू कमी होत चालला आहे. सद्ध्या याची पाने पुष्पगुच्छ व पुष्पसजावटीसाठी मुंबई सारख्या शहरात निर्यात केली जातात. यामुळे स्थानिक जंगलातून याच्या झावळ्या तोडून आणतात त्याचबरोबर झाडाचा शेंड्यालाही हानी पोहोचवतात. या तस्करीत परप्रांतीयांचा सहभाग वाढत आहे. मात्र याच्या संरक्षणाबाबत किंवा लागवडीबाबत तेवढी जागरुकता दिसत नाही.
- नितीन कवठणकर.शेअर नक्की करा. नावासह, नाव पुसून नको.

Tuesday, 30 August 2022
#गणपती #माटी #कोकणी_परंपरा
तळकोकणात गणपतीच्या आसनाच्या वर माटी सजवण्याची खूप जूनी परंपरा आहे. वरच्या कोकणात #मंडपी, तळकोकणात #माटी तर गोव्यात #माटोळी अश्या प्रदेशानुसार वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते.
माटी म्हणजे लाकडाची आयताकृती चौकट असते व त्यात उभ्या-आडव्या पट्ट्या रचलेल्या असून चार बाजूंना चार खूर असतात. माटी ही सागवानी किंवा फणसाच्या लाकडापासून बनवलेली असते. या माटीवर परिसरात आढळणाऱ्या औषधी व आकर्षक वनस्पती बांधल्या जातात. अश्याप्रकारे माटी ही गणपती सजावटीची एक पर्यावरणपूरक पद्धत आहे.
पूर्वी माटीची चौकट ही तयार नसायची. दरवर्षी नवीन चौकट तयार करावी लागायची. त्यावेळी भेरला माडाच्या खोडांच्या छेदांपासून माटी तयार केली जाई. भेरला माड उपलब्ध नसल्यास बांबूपासून सुद्धा बांधली जायची. माटीसारखीच कोकणातल्या चुलीच्या वर एक बांबूंची रचना असायची त्याला #उतव असे म्हटले जाई. उतवाचा उपयोग पावसाळ्यात फटकूर-कांबळी, कपडे किंवा इतर गोष्टी सुकवण्यासाठी केला जाई.
Saturday, 27 August 2022
#माटी बांधल्यात काय रे?
माटी हे कोकणच्या समृद्ध नैसर्गिक व सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक आहे. गणपतीच्या आसनाच्या वर माटी बांधण्यात येते. यामध्ये वेगवेगळ्या वनस्पतींची फळे, पाने, फुले बांधली जातात. हे बांधण्यासाठी लाकडाची #माटी वापरली जाते. जी साधारण आयताकृती असते आणि त्यात उभ्या-आडव्या पट्ट्या असतात.
कोकण हे विविध वनस्पतींनी नटलेले आहे आणि त्यात श्रावण-भाद्रपद महिन्यात येणार्या बहराने ते अजून नटून जाते. माटी बांधण्याचा धार्मिक उद्देश म्हणजे, ही पृथ्वी म्हणजे साक्षात श्री देवी पार्वतीचे रुप आहे आणि ती गणेशाच्या आगमनासाठी विविध वनस्पतींच्या रुपांनी नटली आहे. त्यामुळे याच काळात बहरणाऱ्या वनस्पतींचा वापर माटीमध्ये केला जातो. माटीमधील सर्वात आवश्यक गोष्टी म्हणजे आंब्याचे टाळ, किवनीचे दोर, उतरलेला नारळ, शिप्टा आणि तवसा. 1) आंब्याचे #टाळे :- #आंबा Mangifera indica (Anacardiaceae) माटीमधील सर्वात महत्वाचे झाड म्हणजे आंबा. कोकणात बऱ्याच पवित्र कार्यात आंब्याचे टाळे म्हणजे फांद्यांची डहाळे वापरले जातात. हे टाळे फक्त आंबोलीचेच (रायवळ आंबा) असले पाहिजेत. गारपाच्या (कलमी) आंब्याच्या टाळ्यांचा वापर होत नाही. 2) केवणीचे #दोर (किवनीचे दोर) :- #केवण / मुरडशेंग Helicteris isora (Malvaceae) आंब्याचे टाळे किंवा इतर गोष्टी माटीला बांधण्यासाठी केवणीच्या झाडाच्या सालीचे दोर वापरतात. ही साल खुप मजबूत असते त्यामुळे तीचा वापर केला जातो. केवण हे एक झुडूप आहे. त्याला लाल फुले व पिळदार शेंगा येतात. केवणीच्या शेंगांना मुरडशेंग म्हटले जाते. मुरडशेंग ही लहान मुलांच्या औषधी #सानशी तील एक आहे. 3) उतरलेला #नारळ :- नारळ / माड Cocos nucifera (Arecaceae) माटीमधील महत्वाचे फळ म्हणजे नारळ. खास माटीसाठी झाडावरून न पाडता तर उतरलेला नारळ वापरला जातो. 4) #शिप्टा (कातरो) :- #सुपारी / फोफळ Areca catechu (Arecaceae) शिप्टा म्हणजे सुपारीच्या फळांचे घोस. यांचाही वापर माटीत प्रामुख्याने होतो. 5) #तवसा (काकडी) :- #काकडी Cucumis sativus (Cucurbitaceae) काकडी ही पावसाळ्यात उगवणाऱ्या भाजांपैकी एक व त्यामुळे माटीत काकडी (तवसा) चा समावेश असतो. तसेच याशिवाय प्रत्येकजण आपल्या आवडीनुसार व उपलब्धतेनुसार विविध इतर फळेही माटीला बांधतात. गणेश विसर्जनावेळी नारळ व काकडी कापून प्रसाद म्हणून वाटली जाते. यांशिवाय माटी रंगीत व आकर्षक दिसावी म्हणून आजुबाजुला उपलब्ध असलेल्या इतर जंगली वनस्पतीही माटीत वापरल्या जातात. यात हरण, कवंडळ, कांगणे, सरवड, आयना, तेरडा, वाघनखी, नरमाची फळे व नागकुड्याची फळे यांचा समावेश होतो. 6) #हरण (हराण) :- #सोनकी Senecio bombayensis (Asteraceae) सोनकी हे एक लहान रोपटं असते. त्याला आकर्षण पिवळी फुले येतात. पावसाळ्यात कोकणातील सडे हरणाने भरुन जातात. माटीमध्ये हरण प्रामुख्याने बांधले जाते. 7) #कवंडळ (कौंडाळ) :- कवंडळ Trichosanthes tricuspidata (Cucurbitaceae) कवंडळ ही एक वेल असते. त्याला पावसाळ्यात पांढरी फुले व लाल गोलाकार फळे येतात. ही कवंडळ फळे माटीत वापरली जातात. त्यामुळे माटी अजून रंगीत बनते. 8) #कांगणे (कांगले) :- #कांगुणी Celastrus paniculatus (Celastraceae) कांगुणी ही एक वेल असते. त्याला गोलाकार पिवळी-केसरी फळे येतात. कांगणीच्या फळांचे घोस माटीत बांधले जातात. 9) #सरवड (शेरवाड) :- सरवड Mussaenda glabrata (Rubiaceae) सरवड ही एक आधाराने वाढणारे झुडूप आहे. याला भगवी फुले येतात तर याची नवीन पाने पांढरी असतात. त्यामुळे ही पाने माटीत वापरतात. 10) #आयना :- #ऐन / आयन Terminalia elliptica (Combretaceae) ऐन हे इमारती लाकडाचे झाड. ऐनाची फळे (आयना) पाच पदराची जरा विचित्रच आकाराची असतात. त्यांचे घोस माटीला बांधले जातात. 11) #तेरडा (तिरडा) :- तेरडा Impatiens balsam (Balsaminaceae) पावसाळ्यात बहरणाऱ्या फुलांपैकी एक लहान झाड तेरडा. याची गुलाबी फुले माटीला सुंदर दिसतात. 12) #वाघनखी :- #कळलावी / वाघनखी / खड्यानाग Gloriosa superba (Colchicaceae) वाघनखी ही वेलवर्गीय कंदमुळ वनस्पती. याची आगीसारखी दिसणारी लाल-भगवी-पिवळी फुले माटीत अजुन रंग भरतात. 13) नरमाची फळे :- #नरम / बोंडारा Lagerstroemia parviflora (Lythraceae) नरम हे एक मध्यम आकाराचे झाड. याची फळे काही ठिकाणी माटीला वापरली जातात. 14) नागकुड्याची फळे :- #नागकुडा Tabernaemontana alternifolia (Apocynaceae) नागकुडा हे एक मध्यम झाड. याला तगरीसारखी पांढरी फुले येतात. तर याची पिवळसर केसरी वाकडी फळे माटीत वेगळी दिसतात. काही ठिकाणी यांना वाघनख असे म्हटले जाते. माटी ही कोकणची एक वेगळीच संस्कृती आहे. निसर्गातच आढळणाऱ्या वनस्पती वापरून माटी सुंदर सजवली जाते. यासंबंधात आळस न करता, आपण ही संस्कृती जपली पाहिजे. - नितीन कवठणकर (NK) पाल, वेंगुर्ला, सिंधुदुर्ग Original post link : facebook/nitinkawthankar.Saturday, 5 March 2022
Schedule of AIR Marathi (Asmita)
कार्यक्रमांची रुपरेषा
- वृत्तविशेष (Sat)
- साप्ताहिक विधिमंडळ समालोचन (Sun)
- माझं आवार माझं शिवार (Mon-Sat)
- #AIRNext (Sun)
-
- Dial in : स्वर संवाद (Sun)
- अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम (Sat-Sun)